जिल्हा परिषद , सिंधुदुर्ग

  • महाराष्ट्र शासनाने 1 में 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदा, गट पातळीवर पंचायत समिती व गांव पातळीवर ग्राम पंचायत अशा रितीने पंचायत राजची स्थापना केली.
  • 1 में. 1981 साली जिल्हा परिषदची स्थापना झाली. जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान श्री. आर.बी.दळवी यांना मिळाला. त्यांनी 19/04/1992 ते 20/12/1995 पर्यंत अध्यक्ष पद भुषविले. तेव्हापासून आज अखेर 21 अध्यक्ष झाले.
  • सन 2008 साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001:2000 प्रमाणित झालेली आहे.

 

 

  • आज रोजी 08 पंचायत समिती अणि 430 ग्राम पंचायती ग्रामिण भांगांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाचे कोणतेही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत मालवण गटातील आंबडोस ग्रा.पं. सा 2005-06 मध्ये राज्यस्तरावर स्तरावर प्रथम क्रमांक विजेती ठरलेली आहे.
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2006-07 मध्ये जिल्हा स्तरावर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी अंतर्गत कातवण ता.देवगड या अंगणवाडीला तसेच सानेगुरूजी स्वच्छ शाळा अंतर्गत कातवण ता.देवगड या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त झालेले आहेत.
  • यशवंत पंचायत राज अभियान सन 2006-07 (सा 2005-06 च्या कामगिरीवर आधारीत ) जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तृतीय क्र मांक मानकरी ठरलेली असून र.रु. 2.00 लाखाचे पारितोषिक मिळालेले आहे.
  • कोकण विभागात यशवंत पंचायत राज अभियान सन 2006-07 (सा 2005-06 च्या कामगिरीवर आधारीत ) विभाग स्तरावर मालवण तालुक्यातील साळेल ग्राम पंचायतीस तृतीय क्रमांकाचा बहूमान प्राप्त झाला असून र.रु. 0.30 लाख पारितोषिक मिळालेले आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 1 मे 1981 हया स्थापन दिनाच्या दिवशी कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता व अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळणेस्तव जिल्हा परिषदेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचा गौरव करणेत येतो.