यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तरावरील समितीकडून जिल्हा परिषदेची तपासणी ...

यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ अंतर्गत राज्यातील अतिउत्कृष्ट जिल्हा परिषदांना पुरस्कार देण्यातंर्गत योजनेमध्ये कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्हा परिषदांचे नामांकन झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेबरोबरच मालवण आणि कुडाळ पंचायत समित्यांचेही नामांकन झाले आहे.

यशवंत पंचायत राज अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्ष राज्यात तृतीय क्रमांक राखला आहे.