एक दिवस शाळेसाठी....जिल्‍हयाचे अधिकारी शाळेत रमले...

जिल्हा परिषदेतील वर्ग 1 व वर्ग 2 व विस्तार अधिकारी, अंगणवाडी मुख्य सेविका व महसूल प्रशासनातील वर्ग 1 व वर्ग 2 अशा एकुण 319 अधिकाऱ्यांनी दिनांक ०७ जुलै २०१६ रोजी शाळा भेटी देवुन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

मा.श्री. प्रभाकर देशमुख , विभागीय आयुक्त, कोकण विभाग, यांच्या संकल्पनेतील ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाचा हेतू शांळाची तपासणी करणे ह नसून शिक्षण मोहिमेस पूरक आधार देणे हा आहे. शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी समाजाचा सहभाग घेणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांबद्दल आस्था निर्माण करणे, विदयार्थ्य्ज्ञानी आदर्श व्यक्तीमत्वाचे अनुकरण करणे, शाळांमधील उल्लेखनीय बाबी व गरजा यांची जाणीव करून देणे, समाजातील सर्व घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे , पालकांना गुणवत्तापूर्ण ‍शिक्षणाची हमी देणे, शाळाभेटीमधून बालकांशी समरस होवून बाल आनंद लुटणे हा आहे

त्याअनुषंगाने मा. श्री. शेखर सिंह(भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी शिरवंडे नं. 1 ता. मालवण या शाळेला भेट दिली. अगदी परिपाठापासून ते मुलांची गुणवत्ता पाहण्यापर्यंत संपूर्ण दिवस शालेय कामकाज पाहिले. शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. दुपारच्या सत्रात मुलांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वर्गावर तास घेतला. मुलांबरोबर गप्पा करत या जिल्हयाचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब मुल होवुन गेले. शाळेतील मुलांनी स्वच्छतेबरोबर लेखन वाचन, गणितीय क्रिया तसेच कविता यांचे सभिनय सादरीकरण केले. त्यामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भारलेले होते. मुलांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब परत निघाले तेव्हा मुलांनी गाडीभोवती एकच गल्ला केला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पुन्हा याच शाळेत यावे असा सर्व मुलांचा आग्रह होता.