जिल्हा परिषद , सिंधुदुर्ग

  • कोंकण विभागातील दक्षिण दिण भागाचा औदयोगिक व कृषी क्षेत्रामध्ये जलद विकास साध्य व्हावा आणि विकास योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमतेने व्हावी या दृटीकोनातून स्थानिक लोकांच्या मागणीचा विचार कन 1 मे 1981 रोजी रत्पागिरी जिलहयाचे विभाजन करयात येऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीचा दक्षीणे कडील भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय. सिंधुदुर्ग जिल्हयाची निर्मिती होऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अस्तित्वात आली.
  • सद्यस्थितीत एकूण 8 पंचायत समित्या व 431 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मा.श्री.आर.बी.दळवी यांना प्राप्त झाला. सन 2008 साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयएसओ 9001:2000 मानांकित झालेली आहे.यशवंत पंचायत राज अभियान 2006-07, 2013-14, 2014-15 मध्ये राज्यस्तरावर तृतिय, सन 2017-2018 मध्ये राज्यस्तरावर द्वितीय व सन 2018-19 मध्ये राज्यस्तरावर या जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
  • दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान 2018 अंतर्गत राज्य स्तरावर जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

 

 

  • सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणने प्रमाणे 849651 एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. .
  • सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे.
  • हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही.
  • येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोलीम (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.
  • वाघोटन, देवगड ,कर्ली ,गडनदी ,तिलारी व तेरेखोल या सहा मोठ्या नद्या आहेत . या नद्या सह्याद्रीच्या डोंगररांगात उगम पावून अरबी समुद्रास जाऊन मिळतात. पावसाळ्यात या नद्या रौद्र रूप धारण करून वाहत असतात. तर इतर वेळी विशेषतः उन्हाळ्यात त्या कोरड्या असतात. येथील सर्व नद्यांच्या पात्रांची रुंदी फारच कमी आहे.
  • जिल्ह्यातील नद्यांचा जल वाहतुकीसाठी फारच कमी उपयोग होतो. समुद्रकिनाऱ्यालगत कालावल, आचरा, मोचेमाड व देवगड या प्रमुख खाड्या असून त्यांचा उपयोग जहाजे नांगरण्यासाठी होतो. या खाड्यामधून लहान होड्यांची वाहतूक होते व मोठ्या प्रमाणावर मासेमारीही केली जाते.