योजने स्वरुप :-
अ) एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणा-या दारिद्रय रेषेखालील
व्यक्तिस रु.2,000/- रोख व मुलींच्या नावे रु.8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात
ब) दोन मुलींनतर शस्त्रक्रिया केलेल्या दारिद्रय रेषेखालील
व्यक्तिस रु.2,000/- रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु.4,000/- याप्रमाणे रु.8,000/-
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात
योजनेच्या अटी व शर्थी :-
1) सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यात अधिवासी कुटुंबानाच
देय राहिल
2) लाभार्थी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ील
असावा.
3) पती अथवा पत्नीने केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
राज्यातील शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकिय व्यवसायिक यांचे रुग्णालयात दि.
1 एप्रिल 2007 अथवा तद्नंतर केलेली असावी.
4) सदर योजनेचा लाभार्थीस फक्त एक अथवा दोन मुली असाव्यात
परंतु मुलगा नसावा.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) प्रपत्र अ व ब
2) शिधावाटप पत्रिकेची प्रत
3) मुलींचे जन्मप्रमाणपत्र
4) पती व पत्नी यांचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला
5) गट विकास अधिकारी यांनी सदर कुटुंब दारिद्रय रेषेखालील
यादीत समाविष्ठ असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत
6) रहिवासी दाखला
अर्ज मिळण्याचे ठिकाण :-
1) जिल्हा आरोग्य अधिकारी , जि.प.सिंधुदुर्ग कार्यालय,
2) तालुका आरोग्य कार्यालय सर्व
3) वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सव्र
एक मुलगी असल्यास त्या मुलीचे वय एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर
आणि दोन मुली असल्यास दुस-या मुलीचे वय 1 वर्ष पुर्ण झाल्यानंतर अर्जदारास वरील संबंधित
अधिका-यांकडे अर्ज मिळतील व सदर अजा्रत संपुर्ण माहिती भरुन सदर अर्ज आवश्यक त्या
कागदपत्रांसह नमुद केलेल्या संबंधित अधिका-यांकडे लाभार्थीने शस्त्रक्रिया केल्यापासून
3 वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
|