मागे देवबाग
             


देवांच्या बागेत, देवबागमध्ये गेल्यारवरया जागेला देवबाग हे नाव कादिलं असेल माहीत नाही, पण मला विचाराल तर पुराण काळी ती खरोखर देवांचीच बागअसावी. (नाही म्हणायला आता मानवाच्या व्यवहारी वृत्तीचे ग्रहण लागलेयतिलाही, पण ते चालायचेच) सर्वप्रथम नजरेत भरतो तो दुरपर्यंत पसरलेलापांढर्‍या शुभ्र रेतीचा स्वच्छ समुद्र किनारा...
देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्रतुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी.तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचेस्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्यावालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहूनपिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी वसमुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्लीनदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा आहे.
        मागे