मागे घोडेबांव- कुडाळ
             


             घोडेबांव - सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातील एक ऐतहासिक विहीर(मालवणीत बावडी).शिवाजी महाराजांच्या काळात कुडाळ-सावंतवाडी हा कोकण पट्टा तळ कोकण म्हणून ओळखला जात असे.हा तळ कोकण इतका दुर्गम होता, की तिथे पाण्यासाठी 30 ते 40 किलोमिटर लांब जावे लागत आसे.हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवा प्रमाणे योजना राबवली, जागोजागी विहिरी काढल्या आणि बांधून घेतल्या. घोडेबांव ही विहीर त्यातलीच एक. तिचे महत्व मोठे आहे.मुघलांनी तळ कोकणात आक्रमण केले तेव्हा महाराज जमतील तेवढे मावळे हाताशी घेउन सज्ज झाले. त्या वेळी दमलेल्या घोडे आणि सैन्य यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणुन ही विहीर बांधणेत आली. तळ-कोकणपट्टयात ही एकच घोडेबांव आहे.
        मागे