मागे गोपुरी-कणकवली
             


             गोपुरी आश्रम म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याचे वैभव होय. सफाई, स्वच्छता व स्वावलंबनाचे ब्रीद घेत कै. आप्पासाहेब पटवर्धन यांनी वागदे येथील माळरानावर जमीन घेऊन शेती व ग्रामोद्योगाचे नंदनवन उभारले. कोल्हापूरचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, महात्मा गांधी विचारांचे दानशूर व्यापारी उद्योजक कै. प्रभाकरपंत कोरगांवकर यांच्या आर्थिक सहकार्याने ५ मे १९४८ साली गोपुरी आश्रमाची स्थापना केली. गोपुरी आश्रम हे सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्हयातील कष्टकरी व युवक यांच्या प्रेरणेचे स्थान निर्माण होत आहे. राज्यभरातून अनेक मंडळी गोपुरी आश्रमात श्रध्देने येतात. गोपुरीच्या कामाविषयी आस्था,समाधान व्यक्त करतात. गोपुरी आश्रमाचे विविध विभाग-
1.शेती विभाग :-शेतीत भाताची लागवड अन्नधान्य पीक म्हणून केली जाते. इतर पिकांमध्ये नारळ, केळी, चिकू, पोपळी, निरफणस, पेरु, फणस, रातांबा आदी फळांचे उत्पादन घेतले जाते.
2.नर्सरी विभाग :- या नर्सरीत विविध प्रकारची खात्रीशीर आंबा, चिकू, निरफणस, पेरु या झाडांची कलमे, उत्तम प्रतीची नारळ रोपे मिळतात. शोभेची असंख्य प्रकारची झाडे, इनडोअर, आऊट डोअर शोभेची झाडे, विविध प्रकारची शोभेची झाडे गोपुरी नर्सरीत उपलब्ध आहेत.
3.अमृत कोकम :-गोपुरी आश्रमाच्या आर्थिक उत्पन्नातील महत्वाचा भाग. गोपुरीतील अमृत कोकम महाराष्ट्रात दर्जासाठी व चवीसाठी प्रसिध्द आहे.
4.सामाजिक वनीकरण व फलोद्यान :-खादी संघाने सामाजिक वनीकरणातील सागवान रोपे गोपुरी आश्रमासमोरील पाच एकर जागेत लावली आहेत. तसेच काजूची जवळपास १५० कलमे, आंब्याची ४० कलमे, रातांब्याची कलमे लावण्यास आली आहेत.
5.औषधी वनस्पतींचा बगीचा :-निरनिराळया औषधी वनस्पतींचा संग्रह करण्यात आलाआहे. ब्राम्ही, माका तेल गोपुरीत तयार होते.
6.सुधारीत जैव इंधने आणि स्वयंपाक साधनांचा व्यावसायिकरण प्रकल्प ( आरती प्रकल्प ):-पर्यावरण संतुलनासाठी व धूरमुक्त होणेकरीता पुणे येथील अ‍ॅप्रोप्रिएट टेक्नालॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत वरील प्रकल्प गेल्या चार वर्षापासून गोपुरीत सुरु केला आहे.
7.गो-शाळा विभाग:- >कोकणात गो-शाळा उत्तम चालू शकते याचा यशस्वी प्रयोग प.पू. आप्पांनी गोपुरी आश्रमात केला. दुधाळ जनावरांना ओला चारा आवश्यक असतो. त्याची गोपुरीत लागवड केली जाते. आज गोपुरीत गजराज, पॅराग्रास, मका यासारखा चारा उपलब्ध आहे.
8.निसर्गोपचार केंद्र :-मसाज, बाष्पस्नान, माती उपचार, एनीमा अशा प्रकारचे उपचार या केंद्गातून दिले जाते. स्त्री-उपचारही या केंद्गामध्ये आहे.
9.खादी - ग्रामोद्योग:-खादी उत्पादनाचे काम जरी बंद झाले तरी विक्रीचे काम खादी संघाने थांबविलेले नाही. खादीची विक्री पुणे येथील महाराष्ट्र सेवा संघ व म. गांधी लोकसेवा संघाच्या सहाय्याने केली जाते.
10.पंचायत राज संस्था प्रशिक्षण विभाग:-गोपुरी - पंचायतराज प्रशिक्षण देणारी कोकणातील अग्रगण्य संस्था म्हणुन प्रसिध्द आहे.
11.गोपुरी भांडार :-गोपुरीत तयार होणारा शेतमाल व खादी-ग्रामोद्योग मालाची गोपुरी भांडारात विक्री केली जाते. १७ क्रमांकाच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गच्या बाजूलाच गोपुरी भांडार आहे.
           अधिक माहीती आणि संपर्कासाठी-दुरध्वनी क्र.- 02367-232192 भ्रमणध्वनी- 9420306055
        मागे