|

प्राचीन काळापासून कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्याशंभुमहादेवाची ही भूमी आहे अशी श्रद्धा आहे. या देवाच्या नावावरून गावाचेनाव सुद्धा कुणकेश्वर असे पडले. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेचकुणकेश्वर. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेचनाही. सुमारे ११व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजेकोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. अशा याकुणकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमयअसा आहे.
कुणकेश्वरमंदिर प्राचीन असून यादवकालीन आहे.छत्रपती शिवरायांनीनीळकंठबावडेकरांकरवी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.जांभ्या खडकावरीलशिवलिंगावर काळ्या पाषाणाची शाळुंखा आहे.मंदिराच्या सागरतटाकडील भागाकडेभक्कमबांधीव तट घातला आहे.मंदिराचा कळस भव्य असून त्याची रचनावैशिष्ट्यपूर्ण आहे.मंदिरपरिसरातील समुद्रकिनारी एकवीस शिवलिंगे आढळतात. कित्येक वर्ष समुद्राच्यापाण्यामध्ये असणारी ही शिवलिंगे अजूनही सुस्थितित आहेत. ही शिवलिंगेपांडवानीघडविलेली आहेत असे म्हणतात.कुणकेश्वर मंदिराच्या जवळ काहीप्राचीन लेणीआढळतात.मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या देवगडहुन अवघ्या १८किमी.अंतरावर कुणकेश्वरआहे.
इतिहास :
कुणकेश्वर मंदिराच्या बाबतीत एक दंतकथा सांगितली जाते. कित्येकवर्षांपूर्वी एक अरबी व्यापारी समुद्रमार्गे जहाज घेऊन चालला होता.त्यावेळी समुद्रात अचानक वादळ निर्माण झाले. जहाजासकट आता आपणालाही जलसमाधीमिळणार या भीतीने तो कासावीस झाला इतक्यात जमिनीच्या दिशेने त्याला एकज्योत पेटत असलेली दिसली. याठिकाणी देवाचे स्थान असणार अशी मनाची खात्रीकरून त्याने त्या देवाकडे प्रार्थना केली की, जर का आपले प्राण वाचविलेस तरया ठिकाणी तुझे मंदिर उभारीन, आणि आश्चर्य घडले; वादळ शांत झाले.
आणि तो व्यापारी आपल्या जहाजासहित सुखरूप किनाऱ्याला पोहोचला मग ज्याठिकाणी ज्योत दिसली तेथे पाहणी केली असता त्याला हे कणकेच्या राईतीलशिवलिंग दिसले. मग बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याने कुणकेश्वराचे मंदिरबांधले. नंतर त्याने मंदिराच्या कळसावरुन उडी घेतली व आपली जीवनयात्रासंपविली. त्या व्यापाऱ्याची उडी ज्या ठिकाणी पडली तेथे त्याची समाधीबांधण्यात आली.
|
|
|