उत्कर्षा-प्लस मध्ये झालेल्या सॅनिटरी नॅपकिन वाटपाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद घेण्यात आली आहे....

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पाणी व स्वच्छता मिशन यांचे संयुक्त माध्यमातुन महिला वर्ग मासीक पाळी व्यवस्थापनांतर्गत मानसिक बदल घडवुन आणण्याकरीता उत्कर्षा प्लस हा कार्यक्रम राबविण्यात आला.

या मध्ये 66 हजार सहाशे सात महिलांना 4लाख 242 सॅनिटरी नॅपकिन स्वच्छतेचे वाण म्हणुन वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने 24 जानेवारी 2019 रोजी जिल्हयातील 431 ग्रामपंचायती,8 पंचायत समित्या व जिल्हा परिषद याठिकाणी केवळ 3 तासांच्या हळदीकुंकु कार्यक्रमात विक्रमी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.