|

जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वदूर ज्ञात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याच्या दक्षिणेस समुद्र किनारपट्टीला लागून हे गाव वसलेले आहे.हिरवेगर्द माडांचे बन, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं नेसून उभे आहे रेवतीद्वीप, रेवतीपट्टण किंवा रेवतीनगर म्हणजेच आजचे रेडी गाव. लोहखनिजांच्या खाणींमुळे जगाच्या नकाशावर वेगळी ओळख ठेऊन असलेल्या या गावात सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला ‘यशवंतगड’ ऐतिहासिक वारसा सांगतो तर श्री देवी माऊली, श्री महादेव आणि द्विभुज गणपती या धार्मिक स्थळांच्या त्रिवेणी संगमामुळे आध्यात्मिक अनुभूती देतो.
|
|
|