मागे

शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिधुदुर्ग

प्राथ शाळा क्रीडा स्पर्धा (जि.प.स्वउत्पन्नतून सदरची योजना)
           प्राथ शाळा क्रीडा स्पर्धा ही जि.प.स्वउत्पन्नतून सदरची योजना राबविली जाते. सदरची योजना 1998.99 पासुन सुरु करणेत आलेली आहे.सदर योजनेची अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत:-

1.शालेय विदयार्थ्यांच्या सुप्त क्रीडा, कला, अभिनय व बोदधीक क्षमतेला संधी देणेसाठी.

2.व त्याचा विकास होणच्या दृष्टीने व त्यांचे गुणांचे कौतूक व प्रौत्साहन देण्ेा या हेतूने सदरची योजना शिक्षण विभागातर्फे सुरु करणेत आली.

3.सदरची योजना जि.प.प्रशासन,पालक,समाज व सामाजिक बांधिलकीने काम करणारे लोक यांचे सहकार्यातून यशस्विरीत्या पार पाडली जाते.

4.सदरची योजना के्‌द्र स्तर,प्रभाग स्तर,तालूका स्तर व जिल्हा स्तर अशा प्रकारे आयाजित केली जाते.

5.स्पर्धेत यशस्वी विदयार्थ्यांचा प्रमाणपत्र व शिल्ड देवून गौरव केला जातो. तसेच सर्व गटांतून सर्वसाधारण विजेता व उपविजेता अशी पारीतोषीके दिवून स्पर्धकांचा व गटांंचा गौरव केला जातो.
शालेय पोषण आहार योजना अन्न शिजवून देणे (इयत्ता 1 ली ते 5 वी)
1.म.शासन शा. शि. विभागा कडील दिनंाक 16 मे 2002 चे शा नि. या योजने अंतर्गत 2002-2003 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना शिजवून अन्न देणे.

2.सदरची योजना जि.प.प्राथमिक शाळा, अनुदानित खा.प.शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, वस्तीशाळा,महात्मा फुले शिक्षण हमी शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना लागू करणे.

3. प्रति विद्यार्थी प्रती दिनं 100 ग्रॅम प्रमाणे एकूण उपस्थितीच्या प्रमाणात दरमहा तांदुळ शिजवून दिला जातो. तसेच प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारणे. यासाठी योजना राबविली जाते. तसेच प्रतिदिन प्रति विद्यार्थी केंद्र/राज्य हिस्सा र.रु. 2.08 प्रमाणे अन्न शिजवून देणेसाठी मानधनावर खर्च केला जातो.
राष्ट्रीय शालेय मध्यान्ह भोजन योजना (इयत्ता 6 वी ते 8 वी)
           म.शा. शा. शि. विभागा कडील शासन निर्णय दिनांक 8 ऑगस्ट 2008 चे शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजना इ. 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व तालुक्यां मध्ये सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे.
          सदरची योजना इयत्ता 1 ली ते 5 वी च्या शालेय पोषण आहार योजनेच्या प्रचलीत पध्दतीप्रमाणे , ज्या प्राथमिक शाळांना इ. 6 वी ,7 वी चे वर्ग जोडले आहेत त्या वर्गातील लाभार्थ्यांना सध्याच्या कार्यपध्दतीप्रमाणे पोषण आहार देवून योजना राबविणे, त्याचप्रमाणे माध्यमिक शाळांतील इ. 6वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना विहित केलेला पोषण आहार वाटप स्वंतत्रपणे उपाययोजना करुन योजना राबविणे.
          प्रति विद्यार्थी प्रती दिनं 150 ग्रॅम प्रमाणे एकूण उपस्थितीच्या प्रमाणात दरमहा तांदुळ शिजवून दिला जातो. तसेच प्रतिदिन प्रति विद्यार्थी केंद्र/राज्य हिस्सा र.रु. 2.60 प्रमाणे अन्न शिजवून देणेसाठी मानधनावर खर्च केला जातो.
आदर्श शाळा पुरस्कार
           मा.शिक्षण संचालक, महा. .रा.पुणे यंाजकडील दिनंाक 6.12.1979 चे परिपत्र कान्वये ग्रामिण भागातील प्राथमिक शाळांना आदर्श शाळाना पुरस्कार देणेबाबत आदेश आहेत.
          गटशिक्षणाधिकारी यांचेकडून व्दिशिक्षकी शाळा- व बहुशिक्षकी शाळांचे प्रस्ताव मागवून, विस्तार अधिकारी (शि.) यांचेकडे सदरचे प्रस्ताव प्रत्यक्ष शाळंा भेटी देवून प्रस्तावाची छाननी करुन गुणांकन करणे, वि.अ.यंाचेकडून प्रस्तांवाचे गुणांकन झाल्यावर सदरचा अहवाल निवड समिती पुढे ठेवून निवड समितीचे बैठकीमध्ये बहुशिक्षकी/व्दिशिक्षकी शाळांची निवड करणे.
           निवड झालेल्या शाळांना बहुशिक्षकी शाळांसाठी रु. 200/- प्रत्येकी व व्दिशिक्षकी शाळांसाठी रु. 100/- प्रत्येकी या प्रमाणे पारितोषिक देण्यात येते.
मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी अंतर्गत प्राथमिक शिक्षक व वि.अ.शि यंाना प्रोत्साहनपरपारितोषिक योजना
           म. शा.कडील शा.नि. दिनंाक 13 जून 1984 अन्वये मुलींच्या उत्कृष्ट पटनांेदणी साठी प्राथमिक शिक्षक व वि.अ.शि यंाना प्रोत्साहनपर पारितोषिक योजना राबविणेसाठी मान्यता दिलेली आहे.
          गटशिक्षणाधिकारी यांचेकडून व्दिशिक्षकी शाळा- व बहुशिक्षकी शाळांचे प्रस्ताव मागवून, प्रस्तावाची छाननी करुन सदरचा अहवाल निवड समिती पुढे ठेवून, ज्या शाळांतील शिक्षकांचे मुलींच्या पटनोंदणीचे काम उत्कृष्ट झालेले आहे अशा ीमध्ये बहुशिक्षकी/ व्दिशिक्षकी शाळांमधील शिक्षकांची मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कारासाठी निवड समितीचे बैठकीमध्ये निवड करणे, तसेच ज्या वि.अ.शिक्षण यंाच्या प्रभागातील शिक्षकांना जास्त पारितोषिके मिळाली आहेत अशा वि.अ.ची वि.अ. पारितोषिकाची निवड करणे.
          निवड झालेल्या शिक्षक व वि.अ. यांना प्रत्येकी रु. 100/- या प्रमाणे पारितोषिक देण्यात येवून, उर्वरित रक्कम सादिल खर्चासाठी खर्च केली जाते.
बालभवन योजना
          राज्यामध्ये बालभवन केंद्रे उघडण्याची योजना सन 74-75 मध्ये सुरु करणेत आली . सदर योजना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असून प्रतिवर्षी रु 5000/- अनुदान दिले जाते. 9 ते 14 वयोगटातील मुलांच्या सर्वांगिण विकासास चालना देण्यासाठी शाळेच्या व्यतिरिक्तच्या वेळात बालकांना रंजनात्मक व शारीरिक हालचाली अंतर्भुत असणारे विविध कार्यक्रम व संविधा बाल भवन केंद्रात उपलब्ध करून दिल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये कुडाळ तालुक्यातील माणगांव येथे हे केंद्र आहे.
उपस्थिती भत्ता योजना
          शासनाने 3-1-92 या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यंाच्या जन्मदिनी सुरु करण्यात आलेली आहे.
          प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याबाबतचे धोरणानुसार प्राथमिक शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठीचे इयत्ता 1 ली ते 4 मधील शाळेत जाणा-या अनुसुचित जाती ,भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेतील विद्यार्थींनीना नियमित शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रतिदिन प्रत्येक मुलीमागे 1 रु. या दाराने रक्कम रु.220/- च्या मर्यादेत देवुन योजना राबविली जाते.
          शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्या साठी प्रतििदन 1रु. प्रमाणे वार्षिक र.रु.220/-प्रमाणे अनुदान वितरीत केले जाते.
सावित्रिबाई फुले दत्तक पालक योजना
          सन 1993-94 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक सुधारणासाठी बांधिलकी स्विकारुन स्वखर्चाने मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सेवाभावी पालकंाच्या मार्फत सावित्रिबाई फुले दत्तक पालक योजना सुरु केलेली आहे. गरजु व होतकरु मुलींना शिक्षणासाठी हातभार लावण्याची मोठया प्रमाणात चळवळ उभी करण्याचे दृष्टीने सुरु केलेली आहे. प्रति विद्यार्थीनी रक्कम रु.3,000/- देणगी स्विकारली जाते. त्या देणगीमधुन मासिक रु.30/- किंवा वार्षिक रु.360/- विद्यार्थींनीना ग्रामशिक्षण समितीमार्फत दिले जाते. सदरची योजना 1993-94 पासुन सुरु करण्यात आलेली आहे.
          सामाजिक व शैक्षणिक सुधारणासाठी बांधिलकी स्विकारुन स्वखर्चाने मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने देणगी रु.3000/- स्विकारले जातील.
गणवेश लेखन साहित्य योजना
          अनुसुचित जाती,जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या इयत्ता 1 ली ते 4 थीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखुन उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टिने शासनाने 1976-80 या शैक्षणिक वर्षापासून या मागासवर्गीय संवर्गातील विद्याथर्यांना गणवेश व लेखन साहित्य मोफत पूरविण्याची योजना सुरु केली आहे. सन 2004.05 पासून सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामशिक्षण समिती मार्फत सुरु केलेली असुन जिल्हास्तरावरुन गणवेशचा कमालदर मुलांसाठी (शर्ट व पँट) र.रू.57 - 21/- व मुलींसाठी (स्कर्ट व ब्लाउज) र.रू.69 - 75/- तसेच लेखन साहित्यासाठी 20% रक्कम वितरीत केली जाते. सदरची योजना 1993-94 पासुन सुरु करण्यात आलेली आहे. त्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे:-

1.विद्यार्थी व विद्यार्थींनी ही दारीद्रय रेषेखालील असावी.
2.विद्यार्थी व विद्यार्थींनी ही जि.प.च्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी असावी.
          या योजनेचे उददेश सफल झालेला असुन विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढलेले असे आढळलेले आहे.
पूर्व माध्यमिक शिक्षकांना परितोषिक योजना
          सदरची योजना 1962-63 पासुन सुरु करणेत आलेली आहे. सदर योजनेची अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे:-

1.सदरचे प्रस्ताव ग.शि.अ. यांचेमार्फत मा.सभापती पं.स. व ग.वि.अ. यांचे संमतीने येणे आवश्यक आहे.
2.जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्‌ंून एक प्राथमिक शिंक्षकाची निवड केली जाते.
3.सदरचा पुरस्कार 5 सप्टैंबर या शिक्षक दिनी वितरीत करावा.
4.सदर शिक्षकाची निवड जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत केली जाते.
माध्यमिक/पूर्व माध्यमिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना
          सदरची योजना 1989-90 पासुन सुरु करणेत आलेली आहे. सदर योजनेची अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत:-

1.जिल्हयातील जि.प.प्राथ. शाळांची उपस्थिती टिकविणे हा या योेजनेचा मुळ उद्देश.
2.विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता स्पर्धेत सहभागी होण्यास उत्तेजित.
3.विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शैक्षणिक बाबींचा सराव.
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
          सदरची योजना 2002.03 पासुन सुरु करणेत आलेली आहे. सदर योजनेची अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत:-

1.जिल्हास्तरीत बाल कला क्रिडा स्पर्धेतील वैयक्तिक गटातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रु.100/- दरमहा व व द्वितीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना रु.75 /- दरमहा याप्रमाणे 12 महिन्याची शिष्यवृत्ती आदा केली जाते.
        मागे