मागे तारकर्ली
             

महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या वसागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्यानयनरम्य तारकर्ली गावातील निसर्ग पहाताना, स्कुबा डायव्हिंग करताना आणिजिभेचे चोचले पुरवताना मिळणारा आनंद तुमची रात्र नक्कीच स्मरणीय करील. कोंकण किनाऱ्यावर फिरताना तेथील सागर-पुत्र अर्थात कोळी समाजाची जीवन शैली जाणून घेणे हा एक रंजक अनुभव असेल.तारकर्ली, महाराष्ट्रातील एक सुंदर गाव तुम्हाला तो अनुभव देण्यास सुसज्ज आहे.पर्यटकांसाठी तारकर्ली येथे विवीध प्रकारची जेवणा-खाण्याची व राहण्याचीव्यवस्था उपलब्ध आहे. येथील अनेक बीच रिसोर्ट, हॉटेल्स, खाजगी पर्यटकनिवास, MTDC बीच रिसोर्ट मधून तुमच्या खिशाला परवडणारा निवास तुम्ही निवडूशकता. बरीचशी हॉटेल्स व बीच रिसोर्ट खरोखरच किनाऱ्यावर वसलेली आहेत, पर्यटकांना अगदी २४ तास सागर दर्शन करणारी. विशेष सेवा सुविधा व आरामयांच्या शोधात असल्यास तुम्हीMTDC बीच रिसोर्टच्या झोपड्या (Konkani Huts)निवडू शकता. तारकर्ली येथील समुद्राकडे जाणाऱ्या लांबच लांब रस्त्याच्यादुतर्फा, अगदी घराघरात जेवणाची व्यवस्था होऊ शकते, चक्क घरगुती जेवण कारणइथे अजूनतरी तेवढा व्यावसाईकपणा आलेला नाही.
तारकर्ली येथे पोहोचण्याचे मार्ग:
विमानाने: १९० कि.मी. दाभोली-गोवा एअरपोर्ट रेल्वेने: ४५ की.मी. कुडाळ रेल्वे स्टेशन मोटरगाडीने: ७ की.मी. मालवण पासून, ५४० की.मी. मुंबई पासून, १६० की.मी. कोल्हापूर पासून, १७५ की.मी. बेळगाव पासून.
तारकर्ली काय पहाल:
MTDC च्या कोंकणी झोपड्या (Konkani huts) मालवणी जेवण आणि मालवणच्या खास मच्छी पाकक्रिया स्कुबा डायव्हिंग - स्नोर्कलिंग किल्ले: पद्म्गड आणि सिंधुदुर्ग किल्ला थोडक्यात, तारकर्ली येथील निवास व्यवस्था, जेवण व सागर सानिध्य यातूनतुम्हाला कोकणच्या सागरी जीवनाचे जवळून दर्शन घेता येईल. MTDC ने तर इथेरात्रीच्या मुक्कामासाठी चक्क आरामदायी हाउसबोट (luxury houseboats) उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नित्य नवीन आणि संस्मरणीय अनुभवाच्या शोधातअसलेल्या पर्यटकांनातारकर्लीयेथे मुक्काम करण्यासाठी हे निमंत्रणच आहे.
        मागे