|

तिलारी नदी सुमारे 650 मीटर उंचीवरून खाली कोकणात उतरून गोव्यामध्ये अरबी समुद्राला मिळते. या नैसर्गिक उंचीचा फायदा घेऊन त्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तिलारी प्रकल्प साकारला. त्यानुसार तिलारी नदीवर धामणे गावानजीक दाट जंगलात 38.05 मीटर उंचीचे दगडी धरण बांधण्यात आले. हे धरण वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. चहुबाजूंनी घनदाट जंगलाने व्यापलेले विस्तीर्ण जलाशय पाहताना मन प्रसन्न होते. जलाशयाचा विस्तार तुडये व हाजगोळी गावापर्यंत आहे. धरणातील पाण्याचा वापर करून कोदाळीनजीक घाटात भूगर्भात वीजनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.
|
|
|