|

वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते.
प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे हे गाव.कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा.
|
|
|