|

हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज याने सन ११९५ते १२०० या कालावधीत बांधला. त्यावेळी हा किल्ला “घेरीया” नावाने ओळखला जातहोता. कालांतराने हा किल्ला यादवांनी ताब्यात घेतला नंतर तो विजयनगरच्याराजाच्या ताब्यात गेला. १४३१ साली बहमनि सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह यानेतो ताब्यात घेतला. सन १४९० ते १५२६ या काळात बहमनी राज्याचे पाच तुकडेझाल्याने हा किल्ला विजापुरकरांकडे आला, तो १२५ वर्षे त्यांच्या अमलाखालीहोता. सन १६५३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणाकेल्या.
मुंबईच्या दक्षिणेला तसेच गोव्याच्या उत्तरेला असून किल्याच्याबाजूने ४० किमी लांबीची विजयदुर्ग नावाची खाडी आहे. हे एक उत्कृष्ठ बंदरआहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर एवढीआहे.शिवाजी महराजांनी ३ उंच तटबंद्या, टेहळणी बुरुज तसेच सुटसुटीत अश्याअंतर्गत इमारती बांधून किल्ल्याचे मजबुतीकरण केले. किल्याच्याप्रवेशद्वारात मारुती मंदिर, अंतर्भागात महादेव मंदिर असून भवानी मातेच्यामंदिराचे अवशेषही दृष्टीस पडतात.किल्याला एकूण २० बुरुज असून मध्यभागी घोड्यांच्या पागा आहेत
पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबाचे ओटे तसेच दोन भुयारी मार्ग अशी पाह्ण्यासारखी ठिकाणे आहेत.पाण्यामध्ये बांधलेली भिंत ही ह्या किल्याची खासियत असून ही भिंतशत्रूच्या मोठ्या जहाजांपासून किल्याची राखण करत होती.
इंग्रज, पोतुगीज, डच ह्यांच्यासारख्या परकीयांनीजिब्राल्टर असा ह्या किल्ल्याचा उल्लेख केला होता. मराठ्यांच्या काळातकान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वीआरमार प्रमुख होऊन गेले.
सध्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी छोटस बंदर तसेच S.T. महामंडळाचा डेपो आहे. किल्ल्यापासून जवळच ६-७ किमी च्या अंतरातश्रीदेव रामेश्वराचे जमीन पोखरून तयार झालेल्या जागेत बांधलेले भव्य मंदिरआहे. देवी चौडेश्वरी मंदिर देखील ह्याच परिसरात आहे, ह्या मंदिराचे हल्लीचनुतनीकरण करण्यात आले आहे. जवळच गिर्ये गावात स्थित असलेल्या पवनचक्क्यादेखील पाहण्यासारखे ठिकाण आहे.
|
|
|